पाऊलबुधे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे बी. एड्. परीक्षेत घवघवीत यश

अहमदनगर – डॉ.ना.ज.पाऊलबुधे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाचा महाविद्यालयाचा निकाल 98 टक्के लागला आहे.

महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत, शिंदे शिल्पा शरद प्रथम क्रमांक, कौरा दिपा नवल द्वितीय क्रमांक व येरकळ बेबी सोन्याबापू तृतीय क्रमांक या विद्यार्थिनींनी ’ओ‘ श्रेणी संपादित केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष विनय नाथ पाऊलबुधे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मासीचे प्राचार्य डॉ.शांताराम खणगे, डी.फार्मासीच्या प्राचार्या सौ. अनुराधा चव्हाण, डी.एल.एड.च्या प्राचार्या सौ. कविता सानप, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा