तिळाची पापडी

साहित्य – तीळ एक कप, साखर एक कप, तुप एकटेबल-स्पून.

कृती – सर्वप्रथम तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे. कढईत साखर वितळेपर्यंत हलवत राहावे. पाक तयार झाल्यानंतर त्यात थंड झालेली तीळ घालून घ्यावी. ताटाला तूप लावून तयार मिश्रण ताटात ओतून लाटण्याच्या साहाय्याने पातळ पापडी लाटून घ्यावी. कुकीज कटर साह्याने गोलाकार पापडी कट करा. अशाप्रकारे तयार तिळाची पापडी हवाबंद डब्यात भरून ठेवावे.