दैनिक पंचांग

शुक्रवार दि. 6 डिसेंबर 2019

अमृत, 1941 विकारी नामसंवत्सर मार्गशिर्ष शुक्लपक्ष उ.भा.22।57

सूर्योदय 06 वा. 56 मि. सूर्यास्त 06 वा. 57 मि.

राशिभविष्य-

मेष -आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल.

वृषभ – आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. मनावर नियंत्रण ठेवा. मित्रांचा सहयोग मिळेल.

मिथुन – भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल.

कर्क – इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. शुभ वार्ता देखील मिळतील.

सिंह – वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील.

कन्या – धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल.

तूळ – आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याला त्रास होऊ शकतो. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

वृश्चिक – भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. कुटुंबियांच्या सहवासामुळे दिवस आनंदात जाईल.

धनु – स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील. खाण्या-पिण्यात काळजी घ्या. दिवस आनंदात जाईल. मागील उधारी वसूल होईल.

मकर – मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. दिवस कालच्या इतका सकारात्मक जाणार नाही.

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.

मीन – आरोग्य नरम-गरम राहील. मित्र मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मागील उधारी वसूल होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा