दैनिक पंचांग

रविवार दि. 8 सप्टेंबर 2019

भागवत सप्ताहारंभ, 1941 विकारी नामसंवत्सर श्रावण शुक्लपक्ष मूळ 6.29 सूर्योदय 06 वा. 7 मि. सूर्यास्त 06 वा. 31 मि.

राशिभविष्य-

मेष ः निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल.

वृषभ ः आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मुले व पत्नी यांच्या सहवासामुळे कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहिल.

मिथुन ः जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला होईल. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ.

कर्क ः अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर होईल. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. जुन्या मित्रांचा सहवास लाभेल.

सिंह ः कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. फक्त प्रयत्नांति परमेश्‍वर ही उक्ती लक्षात ठेवावी.

कन्या ः अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश.

तूळ ः उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. क्रीडा, साहित्य या क्षेत्रांमध्ये चमकाल.

वृश्चिक ः काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल.

धनु ः आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याचा प्रयत्न करा.

मकर ः प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मुले आपल्यापासून लांब जाणार नाहित याची काळजी घ्यावी.

कुंभ ः काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. आपल्याकडे राहिलेली लोकांची देणी परत कराल.

मीन ः कामाचा भार अधिक राहील. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. मन आनंदी प्रसन्न राहिल्याने दिवस आनंदात जाईल.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा