पाणचक्की

औरंगाबाद शहरातील पाणचक्की ही अभियांत्रिकीचा अप्रतिम नमुना म्हणून ओळखली जाते. याठिकाणी पाण्याचा दाबाचा वापर करून दगडी जाते फिरवुन दळण दळले जात होते. याची निर्मिती अहमदनगरचा राजा मूर्तुझा निजामशहा याचा वजीर ‘मलिक अंबर’ याने केली आहे. त्यामुळे याला ‘नहर-ए-अंबरी’ नावाने देखील ओळखले जाते.

याठिकाणी येणारे पाणी हे शहराच्या बाहेरून ६ किमी अंतरावरून एका नहरीच्या सहाय्याने जमिनीखालून आणले जाते. नंतर हेच आणलेले पाणी २० फुट उंचीवरून एका धबधब्याच्या स्वरूपात मोठ्या हौदात सोडले जाते. जुन्या काळातील लोकांना अभियांत्रिकीचे किती उत्तम ज्ञान होते हे ही पाणचक्की सांगत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा