श्री विठ्ठल रूक्मिणी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

अहमदनगर – केडगाव येथील मोतीबाग येथे श्री विठ्ठल रूक्मिणी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन नगरसेवक अमोल येवले यांच्या हस्ते झाले.

वाचनाने माणसाच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडून जीवन समृध्द होते, असे याप्रसंगी बोलताना अमोल येवले यांनी सांगितले. व्यक्तीगत व महापालिकेच्या माध्यमातून वाचनालयाच्या विकासासाठी भरीव सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रा. प्रल्हाद साठे होते. विद्यार्थ्यांवर, नागरिकांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम वाचनालयाच्या माध्यमातून राबविले जातील, असे प्रा. साठे यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रूक्मिणी सार्वजनिक वाचनालयास काशिनाथ महाजन यांनी आपली पत्नी स्व. योगिता महाजन यांच्या स्मरणार्थ 125 पुस्तके व एक कपाट वाचनालयास भेट दिले.

मोतीबाग सोसायटीतील सभासदांनी व परिसरातील वाचनप्रेमी व्यक्तींनी आपल्या मुला-मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, स्वर्गीय आई-वडिल व प्रिय व्यक्ती यांचे स्मरणार्थ पुस्तके किंवा वाचनालयासाठी लागणारे साहित्य देणगी रूपाने द्यावेत असे आवाहन याप्रसंगी प्रा. प्रल्हाद साठे यांनी केले.

कार्यक्रमास मोतीबाग सेवा संस्थेचे सचिव सुरेशकुमार यादव, उपाध्यक्ष आप्पा दिघे, शिवाजी व्यवहारे, लक्ष्मण कोल्हे, पंढरीनाथ बी. पाटील, आदर्श शिक्षक आबा लोंढे, खंडेराव दिघे, श्री. गुंजकर, सौ. उज्ज्वला मुनोत, सौ. संगीता लोंढे, सौ. वैजयंता साठे, श्री. लोंढे, श्रीमती कोल्हे आदी व मुले-मुली उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव प्रा. दत्तात्रय साठे यांनी सर्वांचे आभार मानले.