वितरकांच्या अडीअडचणी सोडविणार – कमल नागपाल

‘ऑन’ कंपनीच्या वितरकांचा जिल्हा मेळावा

अहमदनगर- ’ऑन’ ही होजिअरी उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. बनियन, अंडरवेअर, टी-शर्टस्, ट्रॅक पॅन्ट आदींची कंपनीच्यावतीने उत्पादन केली जाते. कंपनीची उत्पादने दर्जेदार व टिकाऊ आहेत. नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी या कंपनी उत्पादनांचे वितरक असून, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन कंपनीचे राज्याचे वितरण प्रमुख कमल नागपाल यांनी केले.

या मेळाव्याचे उदघाटन श्री. नागपाल यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने व दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लितेश आहुजा, कमलेश आहुजा, मनीष आहुजा, कुणाल निकम, अमोल वाघमारे, एरिया सेल्स मॅनेजर सचिन महाजन आदींसह वितरक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑन ही कंपनी लक्स कंपनीशी संलग्न आहे. ऑन कंपनीचे नगर जिल्हा वितरक आहुजा लुंगी हे आहेत.

श्री. नागपाल पुढे म्हणाले की, राज्यातील विविध भागांमध्ये ऑन कंपनीने वितरकांचे जाळे विणले आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आवाक्यातील उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. विविध उत्पादनांना सर्वसामान्यांची प्रथम पसंती आहे, असे ते म्हणाले.

आहुजा लुंगीचे कमलेश आहुजा म्हणाले की, नगर जिल्ह्यात आहुजा लुंगी या दालनाने वेगळा नावलौकिक मिळविला असून, यामध्ये विविध कंपन्यांचे चांगले सहकार्य लाभले आहे. लक्स कंपनीचे को कंपनी असलेल्या ऑन कंपनीचे नाव व उत्पादने घराघरांत पोहोचविण्याच्या आमच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील वितरकांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. ऑन कंपनीची उत्पादने दर्जेदार व वाजवी दरात असल्याने दिवसेंदिवस वाढती मागणी आहे, असे ते म्हणाले.

यानिमित्त काढण्यात आलेल्या लकी ड्रॉचे मेसर्स कृष्णगंगा, राघव मेन्स वेअर, कृष्णा सिलेक्शन मानकरी ठरले आहेत. सूत्रसंचालन लितेश आहुजा यांनी केले, तर आभार सचिन महाजन यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा