70 हजाराची लाच घेणारा वन अधिकारी अटकेत

अहमदनगर- वन विभागालगत असलेल्या गावातील नागरिकांना 75 टक्के अनुदानातून गॅस वितरणाच्या मोबदल्यात गॅस वितरकाकडून 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना वन खात्याचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकला. ही कारवाई बुधवारी (दि.16) सायंकाळी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य येथे केली.

शंकर ऋषिकेश पाटील (वय 42, आर.एफ. ओ. वनजीवसंरक्षण, रेहेकुरी अभयारण्य, कर्जत, रा. साईश्रध्दा अपार्टमेंट, कायनेटिक चौक, अ.नगर, मुळ रा. वालवड, बार्शी, सोलापुर) यांनी शासनामार्फत वनविभागाच्या लगतच्या गावातील नागरिकांना 75 टक्के अनुदानावर होत असलेल्या गॅस वितरणातील लाभार्थींची यादी बनविली. वितरकाने चार गावातील 233 लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन दिले होते. त्याचे बील ही अदा झाले होते. अदा झालेल्या रकमेतुन कमिशन पोटी प्रति लाभार्थी 350 रूपये प्रमाणे 81 हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 70 हजार रूपये देण्याचे ठरले. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पोलीसांनी सापळा रचुन पाटील यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. हि कारवाई पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर, पो.नि. श्याम पवरे, पो.नि. दीपक करांडे, हे.कॉ. तन्वीर शेख, सतिष जोशी, पो.ना. प्रशांत जाधव, रमेश चौधरी, महिला पोलीस राधा खेमनर, चालक हे.कॉ. अशोक रक्ताटे यांनी केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा