नूडल्स धिरडे

साहित्य – 1 कप उकडलेली नूडल्स, दीड कप मैदा, एक लहान चमचा मीठ, अर्धा चमचा काळेमिरे पूड, दोन चीज क्यूब्स, तळण्यासाठी तेल, दूध आवश्यकतेनुसार, सुक्या लाल मिरच्या.

कृती – सर्वप्रथम मिक्सरमध्ये मैदा, मीठ व काळे मिरे पूड घालून नंतर त्यात दूध घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे उकडलेले नूडल्स ठेवावे. त्यावर एक चमचा तयार मिश्रण घालून चांगले पसरवून घ्यावे.

वरून चीज व लाल मिरच्यांचे तुकडे घालून गुलाबी होईपर्यंत दोन्ही बाजूने परतून घ्यावे. सर्व्ह करताना सॉस व चटणी घालावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा