निरंजन सेवाभावी संस्थेने 50 विद्यार्थी घेतले दत्तक

अहमदनगर- निरंजन सेवाभावी संस्थेच्या नगरमधील कार्यकर्त्यांनी सोमतवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे 50 मुले दत्तक घेतले आहेत. त्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, स्वेटर, शूज, सॉक्स, कंपास, टिफीन, वॉटर बॉटल आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याप्रसंगी निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक जयेश कासट, अध्यक्ष जगदिश मुंदडा, धनश्री अॅग्रो इंडस्ट्रीजचे मालक अमित खटोड, निरंजन संस्था अहमदनगरचे अध्यक्ष अतुल डागा, सुहास चांडक, सुमीत चांडक, प्राजक्ता डागा, गौरी खटोड़, दीपिका चांडक, पूनम चांडक, केंद्रप्रमुख सी. के. भालचिम, सतीश बोरकर, जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, प्रवक्ते तानाजी तळपे, सरपंच कमलाकर भालेकर, जालिंदर पांडे, कल्पना पानसरे, सचिन नांगरे, अंकुश साबळे, तुकाराम वडेकर, मुकुंद दिघे, पंढरीनाथ शेळकंदे, रामदास गवारी, चांगदेव जोशी, गणपत तळपे, राजू जोशी, हेमा दिवटे ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. निरंजन सेवाभावी संस्थेने राज्यभरातील 1068 विद्यार्थी संस्थेने दत्तक घेतलेले आहेत. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना मदत करण्याचे संस्थेचे नियोजन असल्याचे संस्थेचे अतुल डागा यांनी सांगितले.