निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता

अहमदनगर- निमगाव वाघा (ता.नगर) येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. रविवारी ह.भ.प. जगताप महाराज (केडगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाचा समारोप झाला.

सकाळी गावात टाळ, मृदंगाच्या गजरात तर विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महिला डोक्यावर तुलसी कलश घेऊन तर भजनी मंडळाचे सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

काल्याच्या किर्तनात जगताप महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्रावर उजाळा टाकून, आजच्या कलियुगात जीवनाच्या सुख, समाधानासाठी नामस्मरणाचा संदेश दिला. त्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण चरित्र कथेत उपस्थित भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. या सप्ताहाच्या सांगताप्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे व ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सप्ताहामध्ये सकाळ, संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह यशस्वी करण्यासाठी सुनिल जाधव, बबन जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, ह.भ.प. बबन जाधव महाराज, बन्सी जाधव, भाऊसाहेब आनंदकर, लक्ष्मण चौरे, तुळशीराम वाघुले, रामदास जाधव, बाबा खळदकर, तुकाराम खळदकर, भाऊसाहेब जाधव, जयराम जाधव, चंद्रकांत जाधव, भागचंद जाधव, राम जाधव, गोरख गायकवाड, श्याम जाधव, शब्बीर शेख, महादेव शिंदे, सचिन उधार, जालिंदर ढोकणे, अंबादास जाधव, कुशीनाथ ढोकणे, जालिंदर जाधव, नामदेव फलके, सोमनाथ ढोकणे, पोपट भगत, विठ्ठल फलके आदिंनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा