नगर तालुक्यातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.विजय औटी

नेप्तीत कल्याण रोड ते बिरोबा मंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

अहमदनगर – नगर तालुक्यातील सर्वच रस्ते एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न असून, तालुक्याच्या विकासासाठी याआधी आपण भरपूर निधी दिला आहे. अंतर्गत रस्ते, पाणी योजना तसेच विविध विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची भावना विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नेप्तीच्या वाड्या-वस्त्यांवरील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी एमआयडीसी येथून स्वतंत्र्य पाईपलाइन टाकण्यासाठी व राहिलेल्या रस्त्यांचे काम पुर्ण करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रयत्नाने नेप्ती येथील कल्याण रोड ते बिरोबा मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन झाले. यावेळी ना. औटी बोलत होते.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, माजी सरपंच विठ्ठल जपकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जालिंदर शिंदे, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी होळकर, चेअरमन रघुनाथ होळकर, भास्कर जपकर, रामदास फुले, सुभाष जपकर, राजू होळकर, अभिजीत काळे, गोरख फुले, उत्तम फुले, बाबासाहेब पवार, अशोक वाघ, अतुल गवारे, बाळासाहेब होळकर, गोरख इंगोले, दशरथ सप्रे, अनिल डोंगरे, प्रकाश कांडेकर, पोपट मोरे, संभाजी गडाख, विजय जपकर, मारुती कावरे, अरुण जपकर, आप्पासाहेब होळकर, दादू चौगुले, गुलाब सय्यद, राहुल गवारे, सुरेश कदम आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

नेप्तीच्या ग्रामस्थांना दळणवळणासाठी कल्याण रोड ते बिरोबा मंदिर रस्ता महत्त्वाचा असून, अनेक वर्षापासून त्याचे काम प्रलंबीत होते. हा रस्ता होण्यासाठी आ. औटी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करण्यात आली असता त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची वचनपुर्ती झाली आहे. या रस्त्याने नागरिकांची चांगली सोय होणार असल्याचे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जालिंदर शिंदे यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत जि.प. सदस्य अरुण होळकर यांनी केले. 25 लाख रुपये खर्च करुन होत असलेला हा रस्ता लवकरच नेप्ती ग्रामस्थांना दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा