पनीरचे भरले फ्रेंच टोस्ट

साहित्य – 8-10 ब्रेड स्लाईसेस, 5-6 ओले खजूर, 2 टे. स्पू. बारीक चिरलेले काजू, 2 टे. स्पू. मिक्स्ड फ्रुट जाम, 50 ग्रॅम पनीर, अर्धी वाटी दूध, 2 टे. स्पू. साखर, 2 स्पू. कणीक, चिमूटभर मीठ आणि 1/2 टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स.

साहित्य – कणकेत दूध, साखर आणि कॉर्नफ्लॉवर मिसळून मिश्रण एकजीव करावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा. खजूर बारीक चिरावेत. पनीर कुस्करून त्यात खजूर, काजू आणि जॅम घालून मिश्रण एकजीव करून ठेवावं. ब्रेडची स्लाईस घेऊन त्यावर पनीरचं मिश्रण दाबून लावावं. त्यावर दुसरी स्लाईस दाबावी. अशी सँडविचेस तयार करून ठेवावीत. निर्लेप पॅनला तुपाचा हात लावून सँडविच तयार मिश्रणात पूर्णपणे बुडवून पॅन तापवून त्यावर एकेक सँडविच सोनेरी तांबूस रंगावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा