केडगाव हत्याकांड प्रकरणात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

अहमदनगर- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.13) मंजूर केला आहे. सुवर्णा कोतकर यांच्या वतीने ॲड. विवेक म्हसे पाटील, ॲड. महेश तवले व ॲड. सागर वाव्हळ यांच्या मार्फत दि.2 जानेवारी रोजी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी (दि.11) सुनावणी झाली. त्यावेळी सरकारपक्षातर्फे तसेच फिर्यादीच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेण्यात आला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीकडून फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला. तर कोतकर याच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. म्हसे पाटील व ॲड. तवले यांनी सदर प्रकरणाचा तपास सीआयडी कडून पूर्ण झालेला असून सीआयडीला आता कोतकर यांच्या कस्टडीची गरज नाही, या शिवाय या प्रकरणाचे 3 दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले असून यात कोतकर यांचा हत्याकांडात सहभाग आढळून आलेला नाही.असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गुरुवारी (दि.13) निकाल देवून सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पुर्व परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडता येणार नाही. तसेच पासपोर्ट जमा करावा, या अटींवर 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे ऍड. महेश तवले यांनी सांगितले. मागील महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगावमध्ये हे हत्याकांड घडले होते. 7 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणात सीआयडीने सुवर्णा कोतकरचेही नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हापासून कोतकर फरारी होत्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा