अंधत्व निवारणासाठी आनंदऋषीजी नेत्रालयाचे व्यापक अभियान-डॉ. प्रकाश कांकरिया

गणेशोत्सवानिमित्त आनंदऋषीजी नेत्रालयात आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला मोठा प्रतिसाद

अहमदनगर – पर्युषण पर्व व गणेशोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय व आनंदऋषीजी व्हिजन सेंटरच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते झाले. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ.कौस्तुभ घोडके, डॉ.पियुष सोमाणी, प्रशासन अधिकारी आनंद छाजेड आदींसह रूग्ण उपस्थित होते. या शिबिरात 150 जणांची तपासणी करण्यात आली तसेच 60 जणांवर मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील महिन्यात नेत्रालयाने एकूण 1250 नेत्र शस्त्रक्रिया करून रूग्णांना निर्दोष दृष्टी प्राप्त करून दिली आहे.

डॉ.प्रकाश कांकरिया यांनी सांगितले की, नेत्र विकारांवर वेळीच उपचार करून अंधत्त्व टाळण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय व्यापक अभियान राबवित आहे. विविध शिबिरांच्या माध्यमातून नेत्र रूग्णांना दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत नेत्रालयाने 30 हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया करण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय मागील महिन्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 60 रेटिना शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय 5 लहान मुलांवरही यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नागरिक, सामाजिक संस्था, एनजीओने नेत्रालयाच्या या निर्दोष दृष्टी प्रदान चळवळीत सक्रिय सहभाग घेवून जास्तीत जास्त नेत्ररूग्णांना प्रभावी उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. याठिकाणी पूर्ण वेळ नेत्र चिकित्सक तसेच नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ उपलब्ध असून जागतिक दर्जाच्या मशीनरीमुळे रूग्णांना त्याचा मोठा लाभ होत आहे. नेत्रालयाने जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचण्यासाठी जामखेड, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, राहुरी, घारगाव, कर्जत, श्रीगोंदा, पैठण, भाळवणी येथे तपासणी केंद्र सुरु केले आहेत. नगरमध्येही केडगाव तसेच सावेडीतील व्हिजन सेंटर कार्यान्वीत आहेत. या सेवेचा रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 0241-2470400/ 8686401515.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा