‘ही’ फळे खा आणि टिकवा त्वचेचे सौंदर्य

वाढतं वय आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल या साऱ्याचा हल्लीच्या जीवनशैलीत बराच विचार केला जातो. मुख्य म्हणजे अनेक जण आपल्या वाढत्या वयाचा थेट परिणाम हा सौंदर्यावर, परिणामी त्वचेवर होणार या चिंतेनेसुद्धा त्रस्त असतात. हीच चिंता आणि तणावापासून दूर राहण्यासाठी मग सुरुवात होते, ती म्हणजे विविध उपाय शोधण्याची. महागडी औषधं हा अनेकांचाच शेवटचा पर्याय असतो, पण तुम्हाला ठाऊक आहे का, रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. चला तर जाणून घेऊया ही फळं नेमकी आहेत तरी कोणती याविषयी…

सफरचंद – सफरचंदामध्ये असणारा एन्झामाईन नावाचा घटक त्वचेचा तजेला कायम राखण्यास मदत करतं. त्वचेला एक वेगळी चमकही सफरचंदामुळेच मिळते. ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे’ असं नेहमीच म्हटलं जातं. त्वचेच्या बाबतीतही असंच काहीसं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि क जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असतं. या घटकांमुळे त्वचेचं सौंदर्य कायम राहण्यास मदत होते, तसंच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरतात.

किवी  – सहसा डेंग्यू या आजारावर उपाय म्हणून खाल्लं जाणारं किवी हे फळ आता अनेकांच्या आवडीचं झालं आहे. डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळं, चेहऱ्यावरील सुरकुत्या यांचं प्रमाण कमी करण्यासाठी किवीतील अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात. या फळात असणारी ई आणि क ही जीवनसत्त्वं वाढतं वय लपवण्यास उपयुक्त ठरतात.

पपई  – त्वचा उजळण्यासाठी पपईचं सेवन करणं कधीही उत्तम. रोजच्या आहारात पपईचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग इत्यादीपासून तुमची सुटका होऊ शकते.

कलिंगड – शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कलिंगडाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. मुख्य म्हणजे सौंदर्याची अर्धीअधिक मदार ही त्वचेवर असते आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी पाणीही तितकंच गरजेचं असतं. परिणामी चिरतरुण सौंदर्यासाठी कलिंगड खाणं खूप फायद्याचं ठरतं.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा