दैनिक पंचांग – गुरुवार दि. 8 एप्रिल 2021

तिथीवासर, 1942 शार्वरी नामसंवत्सर फाल्गुन कृष्णपक्ष, शततारा 28।57 सूर्योदय 06 वा. 28 मि. सूर्यास्त 06 वा. 33 मि.

राशिभविष्य-

मेष        –   कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील.

वृषभ       –  अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ.

मिथुन     –   उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ.

कर्क       –   उत्तम वाहनसुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. काळजीपूर्वक काम करा. महत्वाचे काम टाळा.

सिंह       –   कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल.

कन्या     –   मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.

तूळ       –   आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक   –   मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.

धनु       –    वेळ मनोरंजनात व्यतीत होईल. प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. कामाचा भार अधिक राहील.

मकर      –   मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यवसायिकांना दिवस संमिश्र.

कुंभ        –   काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

मीन        –   वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. देवाण-घेवाण टाळा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा