मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – भेंडीला आपल्या आरोग्याचे पावर हाऊस का म्हटले आहे

माणसाला होणार्‍या आजारांपैकी 50 % आजार हे पोटामुळे होतात. आपले पोट व्यवस्थित असेल तर आपले आरोग्य नीट राहू शकते. आणी पोट व्यवस्थित ठेवण्याचे काम ’भेंडी’ ही भाजी चांगल्या प्रकारे करते. पोटाचे आजार, बद्धकोष्ठ, एसीडीटी यावर भेंडी दररोज खाणे हा उत्तम उपाय आहे. इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्व्हीया झुक यांनी भेंडीच्या भाजीविषयी असे सांगीतले आहे की, भेंडीची भाजी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक अन्नद्रव्यांचे ’पॉवर हाऊस’ आहे. भेंडीतील अर्धा भाग हा गम व पेक्टीनच्या धाग्यांच्या स्वरूपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच ह्रदयविकार कमी होतो. भेंडीतील अतीद्राव्य तंतूमय चोथा हा शरीरातील पचनेंद्रीयांचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी दररोज खाल्ली तर आतड्याचा कॅन्सर बरा होतो तसेच रक्तातील हाय शुगर कमी होते. भेंडीमध्ये असलेल्या पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते त्यामुळेच रक्तातील वाढणार्‍या साखरेचे प्रमाण कमी होते. भेंडीच्या भाजीत बी-6 हे जीवनसत्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलीक आम्ल मुबलक असते. भेंडीमध्ये असलेली रसायने यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता कमी करतो. तसेच आपल्या शरीराला उपयुक्त अशा जीवाणूंच्या वाढीसही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालवण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुसातील संसर्ग, गळ्याचे आजार, गळ्यातील खाज यावर भेंडीची भाजी खुपच उपयुक्त आहे. मात्र हे सर्व लाभ घेण्यासाठी भेंडीची भाजी कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली खावी. भेंडीच्या भाजीत अनेक पोषक तत्वे आणी प्रोटिन्स असतात. शरीराला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाईड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणी सोडीयम यासारखी जीवनसत्वे आहेत. भेंडीत असलेल्या युगोनॉलमुळे डायबेटिस/मधुमेह/ शुगर या आजारावर भेंडी खुपच उपयुक्त आहे. तसेच यातील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. भेंडी हि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात असलेले व्हिटॅमीन सी हे जीवनसत्व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. भेंडीतील पैक्टीन हा घटक रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो. अनिमिया वर रामबाण औषध. भेंडीतील आयरन हे रक्तातील हिमोग्लोबीन निर्माण करते. अनेक तरुण मुली व महीला यांच्यात हिमोग्लोबीन कमी असते त्यावर भेंडी खुपच उपयुक्त आहे. त्यामुळेच भेंडीला लेडी फिंगर असे म्हटले जाते. भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमीन के हे आपल्या शरीरातील हाडांना मजबूत करते. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले व्हिटॅमीन सी आणि एन्टीऑक्सीडेंट हे आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीमला मजबूत करतात. त्यामुळेच आपले शरीर विविध आजारांशी लढते. नेत्रहिनता व डोळ्यांच्या आजारासाठी जे कण हानिकारक असतात, त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. गर्भावस्थेमध्ये महीलांनी भेंडी खाणे फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल हे पोषक तत्व असते. जे पोटातील बाळाच्या मेंदूचा विकास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा