दर्शन कृपा – (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)

त्यांचे अद्भूत प्रेम

– सोमावंती, दिल्ली चुकीने एकदा मी बिलाच्या अधिक बिल चुकते केले. त्या ठेकेदाराने ते बिल माझ्याकडून आणि दुसर्‍या अधिकार्‍यांकडून पासही करून घेतले. जेव्हा व्यवहाराची चौकशी झाली तेव्हा मला दोषी ठरवून चार्टशीट दिले. त्याच दिवसांमध्ये माझी पण होणार होती. मी दयाल पुरूष महाराज दर्शनसिंहजीच्या चरणी पोहोचून सर्व घडलेली सविस्तर हकिगत त्यांना सांगितली. त्यांनी मला प्रेम ाने थोपटून म्हणाले मला माहित आहे ऐकून माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. महाराजांनी आपल्या व प्रेमाच्या अंदाजामध्ये मला सांत्वना देत म्हणाले, चिंता करू नको, महाराज करतील. जेव्हा मी मेरठला परत आलो आणि ऑफिसला गेलो तेव्हा माझ्या आनंदाला ठिकाणा राहिला नाही, जेव्हा मला कळले की माझे चार्टशीट मागे घेतले आहे. अशाप्रकारे मी माझे कार्य करीत राहिलो. 1985 मध्ये माझी पदोन्नती झाली आणि माझे स्थानांतरण पटनामध्ये झाले. स्वाभाविकरित्या मला चिंता वाटू लागली कारण की माझी मुले अजून लहान होती आणि नवीन जागा खुप लांब होती. मी लगेच म हाराजांच्या चरणी जाऊन घटनेची माहिती दिली. महाराजांनी माझे स्थानांतरण आदेश बघितला आणि म्हणाले, यामध्ये तर पदोन्नतीचा प्रश्न आहे तुला जरूर गेले पाहिजे. (क्रमश:133) (कृपाल आश्रम, अहमदनगर)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा