पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी महिलेचे दागिने पळविले

अहमदनगर- पोलिस असल्याची बतावणी करून 67 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 59 हजार रूपये किंमतीचे दागिने नजर चुकवून मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी चोरून नेले. ही घटना सुभेदार गल्लीतील आर. आर. बेकरीजवळ शनिवारी (दि.25) सकाळी घडली. रेखा मदन कचकल (वय-67, रा. सुभेदारगल्ली, झेंडीगेट, हमालवाडा) या आर आर बेकरीजवळुन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी मै पोलिस हुँ, तुम्हारे गल्ली में मर्डर हुआ हैं। असे म्हणुन त्यांना गळ्यातील दागिने काढुन ठेवण्यास सांगितले. यावर कचकल यांनी गळ्यातील दागिने काढले असता ते पिशवीत ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी दागिने चोरून नेले. या प्रकरणी रेखा कचकल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा