जागा उपलब्ध असतांनाही ठेकेदाराने डांबरी रस्ता खोदला महानगरपालिका कारवाई करण्याचे धाडस दाखवेल काय?-माजी नगरसेवक निखिल वारे- बाळासाहेब पवार यांचा संतप्त सवाल

(छाया : विजय मते)

अहमदनगर- अहमदनगर महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ झाला असून, पाईपलाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध असतांना देखील या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने मात्र डांबरी रस्ताच खोदल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निर्मलनगर जवळील पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत अमृत योजनेतंर्गत रस्याच्या कडेने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे हे काम करतांना ठेकेदाराने मात्र जागा उपलब्ध असतांनाही चांगला डांबरी रस्ताच खोदला असल्याने महानगरपालिकेने या ठेकेदाराकडूनच या रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेऊन दंड करुन बेकायदेशीरपणे रस्ता खोदल्याप्रकरणी कारवाई करण्याचे धाडस मनपा दाखवेल का? असा सवाल माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी केला आहे. याबाबत नगरसेविका रुपालीताई वारे यांनीही मनपा आयुक्तांना निवेदन देऊन चांगला डांबरी रस्ता खोदणार्‍या ठेकेदारावर मनपाने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करावी व नियमानुसार दंडात्मक रक्कम वसुल करावी, अशी मागणी केली आहे.

पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत या खोदाईच्या कामात निम्मा रस्ता खोदल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एखाद्या नागरिकाला नळ कनेक्शन घ्यायचे असले तरी रस्ता खोदण्यासाठी परवानगी घेऊन तो रस्ता दुरुस्त करावा लागतो. सर्वसामान्य नागरिकांकडून एक हजार रुपये घेऊन रस्ता खोदणार्‍यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाते. मग या ठेकेदाराकडून देखील दंड वसूल करुन तो रस्ता डांबरीकरण करुन घ्यावा. ठेकेदारावर बेकायदेशीरपणे रस्ता खोदकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी श्री.वारे व श्री.पवार यांनी केली आहे. मनपाच्या अधिकार्‍यांचे व ठेकेदाराचे हितसंबंध असल्यामुळेच मनपा कारवाई करण्यास टाळाटाळ करते, असा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणे श्री.वारे व श्री.पवार यांनी मनोज पारखे यांना वस्तुस्थिती दाखवून पाहणी केली. याबाबत मनपा काय निर्यण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा