भिंगारच्या जोशी गल्लीतील सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

भिंगार- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या जोशी गल्लीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजप नगरसेविका शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या वर्षी 14 जानेवारीला प्रभाग क्र. पाचमधील रस्त्याची कामे हाती घेतली होती. परंतु कोरोना संसर्गजन्य आजारामुळे कामे मंजुर होऊनही प्रलंबित राहिली होती. ती कामे पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा करून 25 रोजी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू करुन पुर्ण करण्यात आले.

यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे उद्घाटन नगरसेविका सौ शुभांगीताई साठे यांनी केले. याप्रसंगी इंजिनीअर अशोक फुलसौंदर, नवनाथ मोरे, गणेश साठे, जोशी गल्लीतील महिला सौ. आशा गोत्राळ, आनंदीबाई पराते, शकुंतला रायकवाड, आशा खाडे, जया नागपूरे, नलिनी जोशी, मुक्ता रायकवाड, रत्नमाला नागपुरे, ज्योती वैद्य, राजू जोशी, राधा गोत्राळ, बकरे, अर्चना नागपुरे, गायत्री नागपुरे, कविता गोत्राळ, सुनीता नागपूरे, शोभा नागपुरे,मुक्ताबाई नागपुरे, कुडाळकर मावशी, पराते काका. इ. उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा