प्रा. वसीम फातेमा अंबेकर यांना हिंदी विषयात पीएच.डी

अहमदनगर- येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या प्रा. वसीम फातेमा अब्दुल अजीज अंबेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादची हिंदी विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही उपाधी नुकतीच घोषित झाली आहे. औरंगाबाद येथील लोकसेवा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनात ‘दावखिनी हिंदी कवी सुलेमान खतीब के काव्य में सामाजिक चित्रण’ या विषयावरील शोधप्रबंध पूर्ण करुन प्रा. अंबेकर यांनी विद्यापीठात सादर केला होता.

प्रा. वसीम फातेमा अंबेकर या गेल्या पाच वर्षापासून राधाबाई काळे महिला महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. नागरी लिपी परिषद, नवी दिल्ली, विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान, प्रयागराज (उ.प्र.) आणि राष्ट्रीय शिक्षक संचेतना या विविध संस्थानच्या त्या आजीव सदस्य ही आहेत. प्रा. वसीम फातेमा अंबेकर यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, उपप्राचार्य डॉ. मनोहर करांडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. रंजना वर्दे सहित सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा