हसत रहा, गोळ्या घ्या, पथ पाळा, बरे व्हा खचून जाऊ नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत -आरंभचे अध्यक्ष चाँद शेख

डॉ. विखे पाटील, मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सर योद्ध्यांस दिली दिवाळी भेट

अहमदनगर- कॅन्सर झाला की ती व्यक्ती व त्यांचे नातेवाईक खचतात कारण पहिला होणारा खर्च तसेच बर होणारा का? यामुळे आरंभ ही संस्था याकरीताच काम करत आहे. तुम्ही हसत रहा, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, गोळ्या घ्या, पथ पाळा, बरे व्हा कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास संपर्क साधा वेदनेशी लढणार्‍या चेहर्‍यांना बळ देऊयात हे आरंभचे ब्रीद आहे, असे प्रतिपादन आरंभचे अध्यक्ष चाँद शेख यांनी केले.

 दिवाळीनिमित्ताने आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व सहकारी मित्र परिवाराच्या वतीने विळद घाट येथील डॉ. विखे पाटील हॉस्पीटल व झोपडी कॅन्टीन येथील मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सर योद्ध्यांस दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी विखे पाटील हॉस्पीटलचे डॉ. भूषण निकम, मॅककेअर हॉस्पीटलचे डॉ. सतीश सोनवणे, डॉ. गरूड हॉस्पीटलचे डॉ. प्रकाश गरुड, आरंभचे अध्यक्ष चाँद शेख, तान्या मुलतानी, आरंभचे खजिनदार गणेश भोसले, जितेंद्र देवकर, विकास जाधव, नितीन भोसले, स्नेहा शेंदूरकर, शिवाजी जाधव, सुमन गवारी, वज्रेश्ववरी नोमुल, शर्मिला कदम, विवेक शिंदे, प्रदीप कनोजिया आदि उपस्थित होते.

 डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, एखाद्या कॅन्सर समजला की, प्रथमत: ती व्यक्ती व नंतर घरातील सर्व व्यक्ती हतबल व निराश होते. सातत्याने कॅन्सरशी लढत असलेल्या रूग्णांना या निमित्ताने प्रेरणा ताकद तसेच त्यांच्या लढाईला साथ देण्याचे काम हे करत आहेत. प्रत्येक रूग्णांशी आरंभचे सहकारी जेव्हा संवाद साधत होते. तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे व आपल्याकरीता दुसरी व्यक्ती काहीतरी करते यांचा अभिमान दिसत होता. आरंभचे जे ब्रीद वाक्य आहे हे या निमित्ताने सार्थ होत आहे. नकळतपणे या कॅन्सरयोद्ध्यांचे हात आशिर्वादाकरीता डोक्यावर कधी येत होते हे समजत नव्हते. कुणी बेकरी, कुणी गृहीणी, दुकानदार, नोकरदार वयस्कर, तरूण असे विविध क्षेत्र व वयोगटातील योद्धे येथे लढत आहे. आज प्रत्येकजण आपल्या घरी दिवाळी साजरी करतो परंतू योध्दे व त्यांचे नातेवाईक मात्र हॉस्पिटलमध्येच. त्यामुळेच आरंभतील पुनीत हा ब्लडकॅन्सरपिडीत आहे त्याने या सर्वाकरीता पणती मणुके व उटण्याचा साबण दिवाळीची भेट दिली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा