आरपीआयच्यावतीने भिंगारमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीएससीत राज्यात चौथी आलेली भावना भिंगारदिवेचा विशेष सन्मान

अहमदनगर- भिंगार शहर आरपीआयच्या वतीने भिंगार मधील इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप देण्यात आली. तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच भिंगार येथील भावना जेव्हियर भिंगारदिवे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रा. सुहास धीवर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल कांबळे, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष जेव्हियर भिंगारदिवे, भाजपचे भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किशोर कटोरे, आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, अ.भा. मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक अमित काळे म्हणाले की, समाजातील शिक्षण व्यवस्थेत गरीब व श्रीमंत अशी दोन वर्ग निर्माण झाले आहेत. काही पंचतारांकित शिक्षण संस्थेत तर काही सर्वसामान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवीत आहे. तर कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांपुढे उदरनिर्वाह व शिक्षणाच्या खर्चाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदतीचा हात आरपीआयच्यावतीने देण्यासाठी शाळा सुरु होण्यापुर्वी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ला मैदान येथील पंडित नेहरु विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुहास धीवर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुहास धीवर म्हणाले की, उच्च शिक्षण हेच परिवर्तनाच एकमेव मार्ग आहे. मागासवर्गीय विद्यार्थी आरक्षणाने नव्हे तर गुणवत्तेने पुढे येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने शिक्षण घेऊन आपले ध्येय गाठत असताना त्याला आरक्षणाचा लेबल लावणे चुकीचे आहे. आजही समाजात स्वातंत्र्य व समतेसाठी लढा सुरु आहे. जातीयवादी विषमतेने समाजाचे नुकसान होत असून, बाबासाहेबांच्या विचाराने देशात समता, स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाने प्रस्थापितांचे वर्चस्व नष्ट करता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भावना भिंगारदिवे यांनी स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींनी पुढे येण्याची गरज आहे. शिक्षणाच्या वयात वेळ वाया न घालवता ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचे सांगितले.

स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन करण्याचा देखील संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी गौतम कांबळे, मनिष सोलंकी, मंगेश मोकळ, प्रविण वाघमारे, दया गजभिये, विलास साळवे, विजय बनसोडे, सोन्याबापू सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेयश कन्स्ट्रक्शनचे लोकेश मेहतानी व बेलेश्वर कन्स्ट्रक्शनचे महेश झोडगे यांचे सहकार्य लाभले. आभार आरपीआयचे आयटी सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा