डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांची प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

अहमदनगर- मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त व नगर येथील क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांची प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने व वैद्यकीय आघाडीचे प्रदेश प्रभारी आ. गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांनी डॉ. दराडे यांना नियुक्ती पत्र दिले.

नाशिक येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या विभागीय बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी नाशिक शहर संयोजक डॉ. चंद्रशेखर नामपुरकर, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. प्रशांत पाटील, प्रदेश संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हंटले आहे की, अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात अविरत केलेले कार्य व सामाजिक जाणीवेतून केलेली उल्लेखनीय सेवेची दखल घेत प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात येत आहे.

या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्यास अधिक प्राधान्य द्यावे. भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे संघटन वाढवायासाठी काम करावे. डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल भाजपाच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मूंडे, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, प्रा.भानुदास बेरड, अभयराव आव्हाड, रामनाथ बंग आदींनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा