कृषीकन्या वैष्णवी हराळकडून बियाणांचे मार्गदर्शन

अहमदनगर- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, सोनई येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्याने गुंडेगाव येथे शेतकर्‍यांना बियाण्यांतील प्रकरांबद्दल कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने शेतकर्‍यांना सत्यप्रत बियाणे, मूलभुत बियाणे, पायाभूत बियाणे व प्रमाणित बियाणे यांच्याबदल माहिती देऊन त्यांचे महत्व शेतकर्‍यांना पटवून दिले. त्याच बरोबर पेरणीला वापरताना प्रमाणित बियाणे वापरावे, कारण प्रमाणित बियाणे हे शास्त्रज्ञांच्या संशोधना खाली तयार होतात आणि त्यातून चांगले पीक भेटते, हेदेखील सांगितले. प्राचार्य डॉ. हरी मोरे, समन्वयक प्रा. अनुप दरंदले कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती जगताप, प्रा. श्रीमती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा