जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या अडचणी दूर करणार-संभाजी कदम

अहमदनगर- शासनाच्या तसेच पालिकेच्या विविध निधीबाबत नगरसेवकांना माहिती नसते. त्यामुळे काम करताना त्यांना अनेक अडचणी येतात. राज्यस्तरीय नगरसेवक परिषदेच्या नर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाल्याने या पदाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या या सर्व अडचणींवर मार्ग काढून काम करू, असे प्रतिपादन संभाजी कदम यांनी केले.

राज्यस्तरीय नगरसेवक परिषदेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने त्यांचा सत्कार माजी उपमहापौर अनिल बोरुडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक मदन आढाव, दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, दीपक कावळे, मुन्ना भिंगारदिवे, पप्पू भाले, सुमित धेंड, अभिषेक भोसले, प्रा. अंबादास शिंदे, दत्तात्रय नागापुरे, अक्षय नागापुरे, प्रतिक शिंदे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी विक्रम राठोड म्हणाले, नगर जिल्ह्यातील नगरसेवकांसाठी संभाजी कदम यांच्या पदामुळे एक व्यासपीठ निम र्ाण झाले आहे. नगरसेवकपदावर काम करताना अनेक अडचणी येत होत्या. आता त्या अडचणी नगरमध्ये कशाप्रकारे दुर करता येतील याबाबत संभाजी कदम यांच्याकडून माहिती घेता येईल आणि त्यांच्या माध्यमातून त्या सोडवता येतील नगरसेवकांनी त्यांची कोणतीही अडचणी असो ती निधी संदर्भात किंवा महापालिका संदर्भात असेल ती दूर करण्यात येईल. सर्व पदाधिकारी यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा