दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)

दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव) – हेतराम, नवीदिल्ली जेव्हा महाराज कृपालसिंहजींनी देहत्याग केला त्यानंतर माझे मन खुप निराश झाले. मला काहीही चांगले वाटत नव्हते. मी रडत असे आणि विचार की जर जीवनाम ध्ये जीवित गुरू नाही तर गुरूविना जीवन जगणे बेकार आहे. त्यामुळे माझे मन भटकले आणि मी साधु-संतांना शोधू लागलो. मी एका माणसाबरोबर एका साधूजवळ गेलो. मला त्या साधुचे नाव माहित होते आणि तो मला परिचित होता. मी माझी व्यथा त्यांना सांगितली. साधुने मला त्यांच्याजवळ ठेवून घेतले आणि मला तेथे सेवा करण्यासाठी सांगितले. मला तेथे भांडे घासणे व साधुची चिलीम वगैरे भरण्याची सेवा दिली. मी एक रात्र तेथे राहिलो परंतु माझे मन रमले नाही आणि मी साधुची आज्ञा घेऊन दिल्लीला निघून आलो. 21 ऑगस्ट नंतर मी सावन आश्रमामध्ये बर्‍याच दिवसांपासून गेलो नव्हतो. एका रविवारी मी आश्रमात गेलो, तर तेथे काही जुन्या सेवादारांव्यतिरिक्त आणखी दुसरे कोणीही भेटले नाही. तेथे सतरंजी अंथरलेली नव्हती, न माइक होता. मी त्यांना विचारले की सत्संग कोठे होतो? त्यावेळी त्यांच्यामधील एक सेवादार ज्यांना आम्ही पंडितजी म्हणून हाक मारीत होतो. ते एका चारपाईवर पुस्तके ठेवत होते. ते माझ्यावर चिडले आणि म्हणाले, सत्संगला कधी येत नाही आणि विचारतो सत्संग कोठे होतो? टिळक नगरला जाऊन महाराजांचा सत्संग ऐक मी आश्रमाच्या बाहेर आलो आणि मागे वळून बघितले तर तेथे पंडितजीही नव्हते आणि पुस्तकेही नव्हती. आता मनामध्ये विचार केला की घरीच बसून राहावे, गुरू जेथे कोठे असेल जरूर त्यांचा पत्ता देतील. मी घरी येऊन बसलो परंतु म ाझे मन उदास राहत असे. एक दिवस अचानक मी एक दोहा वाचला. दया करे तो सत्गुरू मिले’ असे वाटले की तो आवाज तिलकनगर च्या बाजुने आला आणि मी ठरवले की मी तिलक नगरला जाईल. एक दिवस रविवारी मी विचारत विचारत तिलक नगरला पोहोचलो. तेथे सर्व सत्सगांना भेटलो. मी असे ऐकलेले होते की, गुरूच्या शरीरातून चमेलीच्या फुलांचा सुगंध येतो. मी संत दर्शनसिंहजींच्या जवळ पोहोचलो आणि मला खरच चमेलीचा सुगंध आला. एकदा मी माझ्या गुरूंच्या आठवणीमध्ये उदास बसलेलो होतो. महाराज दर्शनसिंहजी माझ्यासमोर प्रकट झाले आणि माझ्या हातात एक सतसब आणि म्हणाले हे बघ ”मी सतसंदेशची पाने उलटूलागलो. बघितले तर संत महाराज दर्शनसिंहजींचे फोटो होते. मला खुप आनंदाचा अनुभव आला. एक सतसंदेशची प्रत दिली. बघितले तर सर्व ठिकाणी असाच अनुभव झाला आणि विश्वास बसला की या वेळचे महापुरुष संत दर्शनसिंहजी आहेत. एकदा माझ्या मुलीचे लग्न होते. मी रविवारच्या दिवशी तिळक नगरला सत्संग ऐकायला आणि काही सत्संगी बंधुंना लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलो. थोडा वेळ सत्संग ऐकून मी विचार केला की महाराजांचे दर्शनही झाले आणि पत्रिकाही वाटल्या म्हणून आता मला निघायला पाहिजे. जसे मी उठलो आणि महाराजांकडे बघून हाथ जोडले, तर बघतो तर काय महाराज दर्शनसिंहजींच्या जागेवर महाराज कृपालसिंहजी सत्संग करीत आहेत. येणार्‍या दिवसांमध्ये हा क्रम बर्‍याचवेळा चालत राहिला, की महाराज दर्शनसिंहजींच्या देहामध्ये कधी महाराज कृपालसिंहजी प्रकट होत असत आणि दर्शनसिंहजी रुप धारण करीत असत. (कृपाल आश्रम, अहमदनगर) (क्रमश:28)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा