आयुर्वेदिक गर्भसंस्कार

गर्भावस्थेतील 3 ते 6 महिन्यांच्या काळामध्ये गर्भ हा गर्भाशयात स्थिर झालेला असतो. सोनोग्राफी मशिनमध्ये बाळाचे डोके, बाळाचे वाढीला लागलेले अवयव स्पष्टपणे दिसतात. या काळामध्ये भावी मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, विहार, योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा आयुर्वेदिक औषधांचे सेवन व गर्भस्थ बालकाशी संवाद, सकारात्मक विचारसरणी या गोष्टी नित्यनियमाने कराव्यात. या सर्व गोष्टींसाठी गर्भसंस्कार करणार्‍या डॉक्टरांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना असे वाटते की, आमच्या काळात या गोष्टी कुठे होत्या. मग आम्हाला काही मुलं झाली नाहीत का, आमची मुले चांगली निघाली नाहीत का? आता कशाला गर्भसंस्कार करायला दवाखान्यात जायला पाहिजे. आम्ही गरोदरपणात सुद्धा दवाखान्यात जात नव्हतो. आमच्या काळात आमची घरीच बाळंतपणे झाली. असा संवाद बर्‍याच घरांमध्ये भावी मातेला ऐकायला मिळतो; परंतु मी असे म्हणते की, त्या वेळेसचा काळ हा वेगळा होता. त्या वेळी बर्‍यापैकी स्त्रिया घरातच काम करीत होत्या. धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी पुसणे, झाडून घेणे यामुळे तिचा शारीरिक व्यायाम भरपूर होत होता. काम करताना थकवा आला, तर एकत्र कुटुंबपद्धतीमुळे तिला जरुरी वाटेल त्या वेळेला थोडासा आराम करणे तिला शक्य होते. घरातील वडीलधारी सदस्यांचा तिला आधार वाटत असे, मार्गदर्शन मिळत असे. त्या बरोबरच त्या वेळेला नैसर्गिकरित्या तयार झालेले धान्य, फळे, भाज्या तिला मिळत होत्या. हवा देखील शुध्द, स्वच्छ, खेळती होती. घरामध्ये भरपूर सदस्य असायचे; त्यामुळे गरोदरपण किंवा बाळंतपण या गोष्टींची काळजी आपोआप नैसर्गिकरित्या घेतली जात असे. त्या वेळेस टेलिव्हीजन, सी.डी. प्लेअर, अश्लील सीडी या गोष्टी अजिबातच नव्हत्या. त्या काळी टी.व्ही. होते; परंतु त्यावर फक्त दूरदर्शन हे एकच चॅनेल असायचे. घरोघरी रेडिओ असायचा; त्यामुळे गर्भवतीच्या कानांवर फक्त रेडिओचे बोल पडायचे व तेच गर्भस्थ बालक ऐकायचे; त्यामुळे त्यांची पुढची पिढी आपोआपच चांगली व सुसंस्कारित घडत गेली; परंतु आताचा काळ फार बदललेला आहे. आत्ताच्या काळात घरी पिकवलेले धान्य, फळे, भाजीपाला उपलब्ध होत नाही. सर्व हवा प्रदूषणयुक्त आहे; त्यामुळे श्वसनाचे रोग उद्भवतात. त्यासाठी व्यायाम करणे फार महत्त्वाचे झाल आहे. व्यायामामुळे फुप्फुसांची श्वसनक्षमता वाढते व बाळाला ऑक्सिजन (प्राणवायु) चा पुरवठा होतो व त्यामुळे बाळाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. (क्रमश:)

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा