शहरातील स्वच्छता मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे

(छाया – लहू दळवी)

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेने नगर शहरामध्ये केंद्र व राज्य सरकारच्यावतीने भारत स्वच्छ अभियान व माझी वसुंदरा अभियाना अंतर्गत शहराची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. दैनंदिन साफसफाई बरोबर घनकचरा विभागातील कर्मचार्‍यांचे ग्रुप करून शहरामधील ठिकठिकाणी रस्त्यावरील माती, दगडगोटे, कचरा, काढण्याचे काम जोरदार सुरू आहे. नगरकरांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वच्छता अभियान ही स्पर्धा राबवून शहर स्वच्छ करण्याचा संकल्प व निर्धार केला आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपली कॉलनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. केंद्र व राज्य सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व माझी वसुंधरा हे अभियान शहरामध्ये सुरू असून प्रत्येकाने जबाबदारीने स्वच्छता राखावी. भारत स्वच्छ अभियानामध्ये मागील वर्षी देशामध्ये 40 वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्या शहराचे नांव उज्वल करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी काम करित आहेत. अशी माहिती घनकचरा विभाग प्रमुख डॉ.नरसिंह पैठणकर यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा