स्वामी विवेकानंद : तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक-शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे प्रतिपादन

(छाया – धनेश कटारिया)

अहमदनगर – बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंद : तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक,असे प्रतिपादन शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास शनि चौक येथे पुष्पहार अर्पण करून शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, संतोष गेनाअप्पा, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, शशिकांत देशमुख, दत्ता कावरे, मदन आढाव, सचिन शिंदे, अरुण गोयल, संग्राम शेळके, मुन्ना भिंगारदिवे, अभिषेक भोसले, अक्षय नागपुरे उपस्थित होते.

सातपुते पुढे म्हणाले स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले. शाळेत असतांनाच अभ्यासाबरोबर विवेकानंदांनी बलोपासनाही केली बालपणात स्वामी विवेकानंदांम ध्ये स्वभाषाभिमान होता, हे दर्शवणारा एक प्रसंग. इंग्रजी शिक्षणाच्या वेळी त्यांनी ही गोर्यांची म्हणजे जेत्याची भाषा मी मुळीच शिकणार नाही. असे म्हणून सुमारे 7-8 महिने ती भाषा शिकण्याचेच नाकारले. पुढे नाईलाजास्तव ते इंग्रजी शिकले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ या विषयात एम.ए. केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा