टोमाटो डोसा

साहित्य –

  1. अर्धी वाटी उडीद डाळ
  2. दोन वाटया तांदूळ
  3. दोन मोठे घट्ट टोमाटो
  4. लाल सुक्या मिरचीचा चुरा
  5. एक चमचा जिरं
  6. चवीनुसार मीठ .

कृती –

  1. डाळ आणि तांदूळ दोन्ही किमान सात ते आठ तास एकत्र भिजत घालावं .
  2. गुळगुळीत वाटून घ्यावं .  इडलीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडं पातळ असलं तरी चालेल .
  3. सकाळी डोसे करायच्या वेळी टोमाटो किसून घ्या .  पिठात टोमाटो , जिरं आणि मिरचीचा चुरा घालून डोसे करावे .
  4. थोडं मीठ घालून , झाकून उबदार जागी फुगत ठेवावं .  सकाळी पीठ फुगलं की चांगलं ढवळून घ्यावं .
  5. डोसा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं .  गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं .  एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं .
  6. बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकिनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा .  मग तवा पुरेसा तापला , की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडायचं .  गैस मात्र मोठाच हवा .
  7. पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं आणि डावाच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर गोलाकार पसरायचं .
  8. ही कृती सवयीनं भराभर करता येते .  बाजूनं तेल सोडायचं .  डोसा कुरकुरीत होतो .  दुसऱ्या बाजूनं करायची गरज नाही .  त्यानंतर प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचं , पाणी नाहीस झालं की पीठ पसरायचं आणि तेल सोडायचं .

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा