कणसाची रस्सेदार छल्ली

साहित्य : 4 अमेरिकन कॉर्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस. कृती : सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हलवून घ्यावे. त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिट्ट्या होऊ द्या. रस्सा तयार करण्यासाठी ः लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे. आवडत असल्यास थोडे लोणीसुध्दा घालू शकता. भुट्टे उकळल्यावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रश्यात चांगल्याप्रकारे चोळून घ्यावे आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा