आयुर्वेदिक गर्भसंस्कार

अशा प्रकारे संपूर्ण प्रसूतिक्रिया साधारणतः 4 ते 10 तास असते. संपूर्ण प्रसूती क्रिया सांगण्याचे कारण एवढेच आहे की, गर्भवतीला प्रसूतीबद्दल माहिती असावी, कारण अज्ञानामुळे स्त्री ऐनवेळेला घाबरून, भांबावून जाते व नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी आवश्यक असणार्‍या कळा व्यवस्थित घेत नाही म्हणून प्रसुतीची माहिती असल्यास ती बिनधास्त मनाने व न घाबरता प्रसुतीला सामोरे जाईल. नैसर्गिक प्रसुतीसाठी करावयाचे प्रयत्न 1) प्रसूती नैसर्गिक व्हावी व स्त्रीला कळा सहज घेता याव्यात याकरिता सूतिकेला मानसिक आधाराची गरज असते; म्हणून परिचारिका व डॉक्टरांची मदत घ्यावी. 2) आयुर्वेदामध्ये अपानवायू प्राकृत अवस्थेत असेल तर नैसर्गिक प्रसूती होते; म्हणत अपानवायूला प्राकृत गती मिळण्यासाठी वातशामक द्रव्यांनी सिध्द केलेले तीळ तेल किंवा गर्भसंस्कार तेल बेंबी भोवती गोलाकार पद्धतीने लावावे. तसेच पाठीला व कमरेला हलक्या हाताने ते तेल चोळावे; त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होण्यास मदत होते. थोड्या प्रमाणात एरंडेल तेल पिण्यास दिल्यासही बद्धकोष्ठता दूर होऊन कोठा साफ झाल्यामुळे अपानवायूला प्राकृत गती मिळते व त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होण्यास मदत मिळते. 3) आयुर्वेदामध्ये विशिष्ट पध्दतीने अ‍ॅक्युप्रेशरचे पॉईंट दाबून हलक्या हाताने कमरेला, पाठीला व पोटाला वातशामक तेल किंवा गर्भसंस्कार तेल लावल्यास नैसर्गिक प्रसूती होते. 4) दोन कळांच्यामध्ये मार्जरासन करावे; त्याम ुळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते व नैसर्गिक प्रसूती होऊ शकते. 5) अ‍ॅक्युप्रेशर – या शास्त्रानुसार शरीरातील जे तेरा (13) चेतनाप्रवाह वाहतात, त्यावर काही ठरावीक अ‍ॅक्युप्रेशरचे बिंदू असतात. त्याचा गर्भवतीच्या सुखकर प्रसूतीसाठी शास्त्रोक्त प्रेशर देऊन उपयोग केला जातो. 6) गर्भवतीच्या कमरेवर एपिड्युरल निस्थेशियाचे इंजेक्शन देतात व त्यानंतर वेदनारहित नैसर्गिक प्रसूती केली जाऊ शकते. यामध्ये गर्भवती न थकल्यामुळे नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण जास्त असते. 7) त्याचप्रमाणे गर्भिणी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुंठ, पिंपळी, कुष्ठ, वेलची, चित्रक, वेखंड, हिंग यांचे चूर्ण हंगावयास दिल्याने किंवा मधातून यांचे चाटण दिल्याने नैसर्गिक पध्दतीने प्रसूती होण्यास मदत होते. 8) गर्भावस्थेत सौम्य आवाजात वारंवार ऐकलेले एखादे संगीत किंवा मंत्र प्रसूतीच्या वेळेस ऐकावे. यामुळे गर्भस्थ बाळ व माता न घाबरता प्रसूती अवस्थेला सामोरे जातात व त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होण्यास मदत होते. सिझेरियनची गरज कधी लागते : आडवे मूल : जर पोटातील मूल आडव्या अवस्थेत असेल, तर सिझेरियन करावे लागते. जुळी मुले : गर्भवतीला एकापेक्षा जास्त मुले उदा.2 ते 3 (जुळी) असतील तर सिझेरियनची गरज लागते. ब्रीच प्रसूती : बाळ डोक्याऐवजी पायाकडून म्हणजेच उलट्या अवस्थेत असल्यास सिझेरियनची गरज असते. (क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा