देशव्यापी संपात महापालिका कर्मचार्‍यांचाही सहभाग

(छाया – धनेश कटारिया)

अहमदनगर- कामगार कायद्यातील बदलांविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात महापालिकेचे कामगारही सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी कामगार युनियन संलग्न असून, संघाने या संदर्भात महापालिकेला रितसर नोटीस दिलेली आहे. पाणीपुरवठा, अग्निशमन व दवाखाने आदी कर्मचारी वगळता सफाई कामगारांसह सर्व कर्मचारी संपात सहभागी झालेले असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव कॉ.आनंदराव वायकर यांनी दिली.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात देशभरातील कामगार आक्रमक झाले आहेत. विविध कामगार संघटनांनी गुरुवारी (दि.26) देशव्यापी संप पुकारलेला आहे. राज्यातील महापालिकांमधील कामगार युनियन या महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी संलग्न आहेत. श्रमिक संघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संघाचे सचिव उदय भट यांनी नगर महापालिकेला तशी नोटीस बजावलेली आहे. पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन व्यवस्था व दवाखान्यांमधील कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

सफाई कामगारही संपात असल्याने शहरातील स्वच्छतेचे कामकाजही बंद राहिले आहे. युनियनच्यावतीने सकाळी गेट सभा घेत सर्व कर्मचार्यांलनी संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले, तसेच हा संप कशासाठी याबाबत कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली. यावेळी युनियनचे अध्यक्ष कॉ.अनंत लोखंडे व कॉ.आनंदराव वायकर, आयुब शेख, अकिल सय्यद, गुलाब गाडे, विठ्ठल उमाप आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा