संस्कारक्षम पिढी घडविण्यात जिल्हा वाचनालय अग्रेसरकोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, सुरक्षित रहा -अनंतराव वाघ

अहमदनगर- महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगुण असलेल्या भारत देशातील उगवत्या पिढीला वाचन संस्कृतीतून घडविण्यात अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे योगदान अमुल्य असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंतराव वाघ यांनी केले. वाचनालयाच्या . भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, वाचनालयाचे संचालक दिलीप पांढरे, किरण आगरवाल, अनिल लोखंडे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, दीपा निसळ वाचनालयाचे ग्रंथपाल संदिप नन्नवरे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते. अनंतराव वाघ पुढे बोलतांना म्हणाले, जिल्हा वाचनालयाच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे राजाराम मोहनरॉय प्रतिष्ठानने 1992 ते 2019 या काळात सुमारे 11,925 पुस्तके देणगी दाखल दिली आहेत; यापुढेही जिल्हा वाचनालयाच्या आधुनिकीकरणासाठी प्रतिष्ठान सर्वोतोपरि अर्थसहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्री. वाघ यांचा सन्मान वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.गाडेकर यांचा सत्कार दिलीप पांढरे यांनी केला. आभार गणेश अष्टेकर यांनी मानले. यावेळी ग्रंथालय कर्मचारी-वाचक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा