प्रेरणादाई अक्षरधन -जगातला सर्वोत्तम गुंतवणूकदार व श्रीमंत वॉरेन बफे

अर्थसाक्षर व व्यवसायिक, उद्योग जगताबरोबरच नव्या पिढीला वॉरेन बफे नाव चांगलेच परिचित आहे. गुंतवणूक, इकॉनॉमिक व्हॅल्यू आणि विशेषतः शेअर बाजारातले योग्य जाणकार म्हणून त्यांची जगप्रसिद्ध ख्याती आहे. वॉरेनच्या मते गुंतवणुकीचा अर्थ आहे वर्तमानमध्ये भांडवल लावून भविष्यात फायदा कमविणे. त्यांची मान्यता आहे की, गुंतवणुकीसाठी वयाला आधार बनवणे जरूरी नाही. (त्यांना तर बाराव्या वर्षीच शेअर मार्केटमध्ये येऊनसुद्धा उशिरा आल्याचा मोठा पश्चात्ताप वाटतो) शेअर्स खरेदी असो वा निश्चित उत्पन्नाच्या किंमतीला बॉण्ड प्रकारात गुंतवणूक असो त्याची गुणवत्ता अन् किमान किंमतीला निवडता आले पाहिजे. वॉरेन मानतात की अनिश्चितता पाहून घाबरण्याची गरज नाही. समस्या तेव्हा येते जेव्हा गुंतवणूकदाराजवळ माहिती नसते किंवा त्याला माहीत नसते की तो काय करत आहे .

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा