महापालिकेची सोमवारी ऑनलाईन अंदाजपत्रकीय सभा

अहमदनगर – कोरोनामुळे गेल्या 7-8 महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेस अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी (दि.19) ही सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. अंदाजपत्रकीय सभा होत नसल्याने नगरसेवक निधी व इतर निधीमधील कामे रखडली होती. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी होती. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून या सभेचा प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे पाठविण्यात आला होता. सोमवारी (दि.12) सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महासभेचा अजेंडा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.19)ही सभा होत आहे. कोरोनामुळे मालमत्ता कराची वसुली झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. मालमत्ता कराची आतापर्यंत केवळ 13 कोटींची वसुली झालेली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार किती टक्के खर्चाला मान्यता मिळते, यावरच प्रभागातील विकासकामे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा