मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करणार्‍या संस्थेस ‘कारणे दाखवा नोटीस’-अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अहमदनगर- मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या अहमदनगर येथील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद करण्याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या एजन्सी संदर्भात तक्रारी येत असल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयास कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयामार्फत मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणारी संस्था मे. साई आनंद एजन्सी, स्वस्तिक चौक, नगर या पेढीची चौकशी केली असुन त्याअनुषंगाने या पेढीस सहाय्यक आयुक्त (औषधे) अशोक राठोड यांनी काम बंद करण्याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. याशिवाय, इतर मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या संस्थेनस मेडिकल ऑक्सिजनची विक्री करतांना भारत सरकार रसायन व उर्वरक मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दि. 25 सप्टेंंबर 2020 रोजी प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार दर आकारण्यारच्या सूचना केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठा दराने आकारण्यात येणार्‍या किंमती बाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0241-2430243/7045757882 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.राठोड यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा