दरोडेखोरांची टोळी मुद्देमालासह पकडली

अहमदनगर- लोणी येथील सराफ दुकानावर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटून नेणारी दरोडेखोरांची टोळी लोणी पोलिसांनी शिताफीने पकडली. त्यांच्याकडून 21 किलो चांदीसह साडेचौदा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. संतोष मधुकर कुलथे त्यांच्या कारने घरी जात असताना दोन मोटारसायकलवरील चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून कारची काच फोडून आतील 14 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी नवनाथ साहेबराव गोडे (रा.सावळी विहिर, ता.राहाता), अतुल चंद्रकांत आमले (वय 24, रा.कर्वेनगर, घोसाळे, जि.पुणे), सागर गोरख मांजरे (वय 23, रा.भातापूर, ता.श्रीरामपूर) यांना शिरुर, जि.पुणे येथून अटक केली. चौघांनी चोरीचा माल सदाशिव प्रल्हाद टाक (वय 47, रा.खारामळा, शिरुर, जि.पुणे) यास विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी 21 किलो 70 ग्रॅम वजनाची चांदी किंमत अंदाजे 13 लाख 23 हजार 700 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली 70 हजार रुपयांची बजाज पल्सर मोटारसायकल, 60 हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर 150 मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि मिथुन घुगे (शिर्डी पोलिस ठाणे), लोणी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रकाश पाटील यांच्या पथकातील पो. ना.सुरेश देशमुख, किरण कुर्‍हे, दीपक रोकडे, गजानन गायकवाड, फिरोज पटेल, सायबर सेल श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक फुरकान शेख, आकाश भैरट यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा