बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या आजारांविरोधात लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी 

दररोज एक चमचा च्यवनप्राशचं सेवन करून दिवसाची सुरुवात करा. तुम्हाला मधुमेहाचा त्रास असल्यास शुगर फ्री च्यवनप्राशचे सेवन करावे.

हर्बल टी किंवा औषधी काढ्याचं सेवन करा. यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यामध्ये उकळा. हे मिश्रण नीट उकळल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दिवसभरात या काढ्याचं तुम्ही एक किंवा दोन वेळा सेवन करू शकता. काढ्याची चव अतिशय तिखट वाटल्यास यामध्ये तुम्ही गुळ किंवा लिंबूच्या रसाचा समावेश करू शकता.

150 मिलिलीटर दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून तयार झालेले हळदीचं दूध दिवसातून एक किंवा दोन वेळा प्या. हळदी दूध पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेचच कोणताही पदार्थ खाण्याची चूक करू नका.

तिळाचं तेल, नारळाचं तेल किंवा शुद्ध तूप आपल्या दोन्ही नाकपुड्यांना लावा. दिवसभरात हा उपाय दोन वेळा करा. सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा. या प्रक्रियेस प्रतिमर्श नष्य: (Pratimarsh Nasya) असे म्हणतात.

पुदिन्याची पाने आणि ओवा एकत्रितरित्या पाण्यामध्ये उकळा. या पाण्यानं वाफ घ्या. यामुळे तुमचा खोकला-सर्दीचा त्रास कमी होईल.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा