शिष्योत्तम

“तुम्ही ज्या मोहनलालबाबूंचं नाव सांगितलं त्यांची अन् तुमची ओळख कुठली?” “शृंगपुरात त्यांच्या शाळेत मी शिक्षक होतो. मोहनलाल बाबूजी धनवान होते; पण त्यांना धनाचा गर्व नव्हता. “जर त्यांची अन् तुमची भेट झाली असती तर काय त्यांनी हजार रुपये दिले असते तुम्हाला?” “नक्की दिले असते हजारच काय पाच हजार मागितले असते तरी दिले असते. दयेची प्रत्यक्ष म ूर्तीच आहेत ते. गरीबांचं दैन्य-दुःख दूर करताना त्यांनी कधी कंजूषी केली नाही. मुक्त हस्तानं त्यांनी गोरगरीबांसाठी पैसे उधळले.” “किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही?” “झाली असतील साहेब पस्तीस छत्तीस वर्षं. नीटसं आठवत नाही.” “एवढा काळ गेल्यावरही आपल्याप्रती त्यांची हीच भावना असेल कशावरून?” “नक्कीच असेल साहेब. कारण ते मनुष्य नाहीत, देव स्वरूप आहेत ते. सज्जनांच्या स्वभावात जन्मजन्मांतरात बदल होत नाही. त्यांची भेट झाली नाही हे माझं दुर्दैव! हजारो रुपये मागितले असते तरी त्यांनी मला नाही म्हटलं नसतं.” “ठीक आहे. तुम्ही जाणूनबुजून विनातिकीट प्रवास करत नाही आहात हे आलं लक्षात; पण नियमानुसार तुम्हाला दंड भरावाच लागेल. तुम्हाला दंड ठोठावणं माझं कर्तव्य आहे. मला ते करणं भाग आहे.” “ठीक आहे. मला थोडा अवधी द्या.” मॅजिस्ट्रेटनं एक पत्र लिहून चपराशी गिरीधारी याचे जवळ दिलं. आणि सांगितलं, “हे पत्र शृंगपूरला जा. तिथे मोहनलाल बाबूंची कोठी कोणती हे विचार. कोणीही सांगेल. पत्र त्यांना दे आणि ते काय उत्तर देतात ते घेऊन ये.” (क्रमश:)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा