शेतकर्‍याचा संताप

एका शेतकर्‍याने आपल्या मळ्यात भाजीपाला, फळे आणि ज्वारीही केली होती. पिकं तयार झाल्यावर कोल्ह्यांनी पिकांची नासाडी करीत धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍याला फार राग आला. कोल्ह्यांना पकडण्यासाठी त्याने एके ठिकाणी चाप लावला. एका चापात एक कोल्हा बरोबर अडकला. सकाळी चापात अडकलेला कोल्हा पाहताच शेतकर्‍याचा संताप अनावर झाला. कोल्ह्याला चांगलीच अद्दल घडवावी, या हेतूने त्याने तेलाने भिजवलेली चिंधी कोल्ह्याच्या शेपटाला बांधून ती पेटवून दिली. आगीने होरपळलेला कोल्हा सैरावैरा धावत ज्वारीच्या पिकात शिरला. ज्वारी वाळून कापणीला आली होती. तिने पेट घेतला. थोड्याच वेळात ज्वारीचे संपूर्ण शेत जळून खाक झाले. हे पाहून शेतकर्‍याने कपाळावर मारुन घेतले. ‘कोल्ह्याचा सूड घेण्यासाठी संतापाच्या भरात मी माझेच नुकसान करुन घेतले’, असे म्हणत तोही पश्चातापाने होरपळू लागला. तात्पर्य ः संतापाच्या भरात परिणामाचा विचार न करता केलेले कृत्य नाशास कारणीभूत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा