गुगल लवकरच देशात फूड डिलिव्हरी क्षेत्रात उतरण्याची शक्यता

भारतातील गुगलचे ग्राहक लवकरच या सर्च इंजिनच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत.गुगल लवकरच देशात फूड डिलिव्हरी क्षेत्रात उतरण्याची शक्यता आहे. गुगलच्या या निर्णयामुळे स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने फूड डिलिव्हरी सेवेच्या चाचणीलाही सुरुवात केली आहे.सध्या गुगलची खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा अमेरिकेत सुरू आहे. गुगलमुळे स्विगी आणि झोमॅटोला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही नुकतीच देशात फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीने बेंगळुरूच्या काही भागात ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉनमुळे स्विगी आणि झोमॅटोसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

गुगलने नुकताच रिलायन्स जिओसोबक करार केला आहे. जिओ आणि गुगल यांच्यात झालेल्या करारानुसार एक परवडणारा फोन तयार करण्यात येईल. अशा प्रकारचा फोन आणण्याची गुगलची पहिलीच वेळ नाही. गुगलचा अँड्रॉईड गो हा प्लॅटफॉर्म आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा