भारतात गुगल करणार अब्जावधींची गुंतवणूक

गुगल भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबरोबर Video Conferencing द्वारे चर्चा केली आणि त्यांच्या या बैठकीनंतर लगेच दुपारी गुगलने भारतामध्ये 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार असल्याचं जाहीर केलं. फक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी , पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही 10 अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं. सुंदर पिचाई यांनी केलेल्या घोषणेतला महत्त्वाचा भाग असा की, भारताच्या डिजिटायझेशनमध्ये याचा फायदा होईल. शिवाय भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा