राष्ट्र प्रेमाचे स्फुलींग पेटवा-संगीततज्ज्ञ लक्ष्मणराव डहाळे

अहमदनगर- देश महासत्तेचे स्वप्न पहात असतांना प्रत्येकाने आपल्या मनातुन कृतीतून आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. जिल्हा वाचनालयाने आयोजित केलेल्या स्फुर्तीगित स्पर्धेतुन उगवत्या पिढीत देशप्रेमाचे स्फुलींग पेटवा, असे आवाहन उपस्थित पालक शिक्षकांना ज्येष्ठ संगिततज्ज्ञ लक्ष्मणराव डहाळे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्फुर्तीगित स्पर्धेच्या पारितोषिक समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. डहाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. शिरिष मोडक होते.

याप्रसंगी उपाध्यक्ष अजित रेखी, सहकार्यवाह उदय काळे संचालक किरण आगरवाल, प्रा.ज्योती कुलकर्णी, दिलीप पांढरे, गणेश अष्टेकर,परिक्षक प्रकाश शिंदे, सौ. वर्षा पंडित, ग्रंथपाल संजय लिहिणे उपस्थित होते.

या स्पर्धेत लहान गटात नवीन मराठी शाळा विश्रामबाग तर मोठ्या गटात भाऊसहोब फिरोदिया हायस्कुलने प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते.

प्रा. मोडक अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शालेय जीवनात वाचन, कला, संगित या माध्यमातुन राष्ट्र, समाज व कुंटूब यावर प्रेम वाटून त्यामधुन देशाची प्रगती घेण्यासाठी वाचनालय सातत्यपुर्ण प्रयत्न करत असुन यावर्षीचा मोठा प्रतिसाद हे या स्पर्धेचे यश असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी केले. निकाल वाचन गणेश अष्टेकर तर आभार उदय काळे यांनी मानले. स्पर्धेचा सविस्तर निकाल प्रमाणे-(लहान गट) द्वितीय – समर्थ विद्या मंदिर, सावेडी, तृतीय- बाई इचरजबाई फिरोदिया, उत्तेजनार्थ-आर्मी, पब्लिक स्कुल, बालक मंदिर महिला मंडळ, जि.प.शाळा सारोळाबद्दी, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लीश मेडियम स्कुल, विशेष पारितोषिक लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कुल.

मोठा गट : द्वितीय – ज्ञानसंपदा इंग्लिश मेडियम स्कुल, तृतीय-नवीन मराठी शाळा, उत्तेजनार्थ- आर्मी पब्लिक स्कुल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडियम स्कुल, सविता रमेश फिरोदिया स्कुल, रेसिडेन्शीयल हायस्कुल (विशेष प्राविण्य) स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहा.ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, ओंकार बडगु, विठ्ठल शहापुरकर, पल्लवी कुक्कडवाल यांचे सहकार्य लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा