जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

केवळ भारतातच नाही, तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पूजला जातो. भारतात गणेशोत्सवाला जोरदार सुरुवात होते. जगात जेवढी म्हणून गणेश मंदिरे आहेत, तेथे गणेश हा गजमुख आहे. तामिळनाडूतील एक मंदिर मात्र याला अपवाद असून, येथे गणेश मानवी चेहरा असलेला आहे. तीलतर्पणपुरी या तामिळनाडूतील कुतनूर गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर असून, त्याला आदीविनायक मंदिर असे म्हणतात.

हे मंदिर फार मोठे नाही, मात्र त्याचे आणखी एक विशेष म्हणजे येथे भाविक पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात. मानवी चेहरा असलेली ही मूर्ती जगात एकमेव आहे असे सांगतात. याठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती. तीलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे. तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित. पुरी म्हणजे नगर. याच आवारात एक महादेव आणि सरस्वती मंदिरही आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा