नामदेव एकशिंगे यांचे वृद्धापकाळाने निधन

पाथर्डी – तालुक्यातील माळेगाव येथील ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते व माजी पोलीसपाटील नामदेव एकशिंगे (वय 85) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. नामदेवपाटील एकशिंगे यांच्या अंत्यविधीस समाजाच्या सर्व स्तरातील लोक उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले विद्यालयातील वरिष्ठ लिपिक नारायण एकशिंगे यांचे ते वडील तर पोलीस हवालदार मुकुंद एकशिंगे यांचे ते चुलते होत. एकशिंगे हे वृद्धेश्‍वर कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब राजळे यांचे तसेच दिवंगत नेते दादापाटील राजळे यांचे एकनिष्ठ व विश्‍वासू कार्यकर्ते समजले जात. त्यांनी सुमारे चाळीस वर्षे गावचे पोलीस पाटील म्हणून काम केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा