खोसपुरी ग्रामस्थांच्यावतीने अस्मिता नागरगोजेचा सत्कार

अहमदनगर – ईस्त्रो सहलीसाठी निवड झालेली जिल्हापरिषद खोसपुरी शाळेची विद्यार्थिनी अस्मिता नागरगोजेचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी घेतलेली मेहनत व विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे मुलाखतीमधून निवड झालेल्या सर्वसामान्य कुटूंबातील बालवैज्ञानिकाला विमान प्रवास करण्याचा व अभ्यासदौरा करण्याचा योग आला आहे. जि. प.शाळा खोसपुरी या शाळेतील इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी अस्मिता रविंद्र नागरगोजे या विद्यार्थीनिची ईस्रो सहलीसाठी निवड झाली आहे.

अस्मिता नागरगोजे हिने निबंध स्पर्धेत नगर तालुक्यातील ९ मुलांमध्ये स्थान मिळवले. आणि जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या मुलाखतीत आपल्या कल्पक बुद्धीने तालुक्यात स्थान पटकाविले. त्यानिमित्ताने आज खोसपुरी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व शाळेच्या वतीने अस्मिता व तिचे आईवडील यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सोमनाथ हारेर यांनी यावेळी अस्मिता नागरगोजे हिला पुढील शिक्षणासाठी ग्रामस्थांच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार, सरपंच सोमनाथ हारेर, उपसरपंच अल्ताफ बेग, धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अस्मिता नागरगोजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर जि थुंबा (केरळ) येथे वैज्ञानिक सहलीस जाणार आहे.

यावेळी शाळेतील शिक्षक रविंद्र दरेकर, मनोज काशीद, राहुल लोंढे, विजय मिसाळ, बाळासाहेब कदम, वैशाली खरमाळे, मुख्याध्यापक कमल पठारे, जेऊर केंद्रप्रमुख आशा फणसे, सिमोन भालेराव, अंबादास देवकर, बंडु नागरगोजे, अनिल नागरगोजे, गणेश आव्हाड, विजय भिसे, आसाराम वाघमोडे, सोपान आव्हाड, आण्णासाहेब पाटील, प्रल्हाद भिसे, रविंद्र नागरगोजे, संजय वाघमोडे, अंबादास दहिफळे, अंकुश नागरगोजे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.